परशुराम मंदिरामध्ये साजरे होणारे धार्मिक सण–
देवभूमी कोकण
कोकण भूमी ही परशुरामांनी निर्माण केलेली भूमि आहे. प्रत्यक्षात गुजराथपासून केरळपर्यंत परशुराम निर्मित भूमीआहे.कोकणला ‘देवभूमी’ मानण्यात येते. येथील सुंदर निसर्ग, अथांग सागराचे व सह्याद्रीच्या शिखरांचे सान्निध्य व लोकोत्तर महापुरुषांची जन्मभूमी हे कोकणचे वैशिष्ट्य या देवभूमीत शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेली अनेक देखणी मंदिरे आहेत, सिद्ध पुरुषांची पवित्र स्थाने आहेत. अनेक मंदिरे स्वयंभू स्थान लाभलेली आहेत. साऱ्या देशातून या देवभूमीत पर्यटनासाठी आणि देवदर्शनासाठी भाविक येत असतात. कोकणी माणूस अत्यंत धार्मिक तेवढाच अतिथ्यशील आहे.
श्रीक्षेत्र परशुराम हे शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेले महेंद्र पर्वतावरील तीर्थक्षेत्र आहे.चिपळूणपासून पाच मैलांवर असलेल्या या तीर्थक्षेत्रास श्रीपरशुरामांच्या वास्तव्यामुळे पौराणिक संदर्भ आहेत व परमहंस ब्रह्मेंद्रस्वामी यांनी तीनशे वर्षांपूर्वी तेथे उभारलेल्या प्रकल्पाला व महाराष्ट्रभर केलेल्या सार्वजनिक व हिंदवी स्वराज्याच्या कार्याला विशेष महत्त्व आहे.

परशुराम चरित्र
विष्णूचा सहावा अवतार मानल्या गेलेल्या भगवान परशुरामांचे स्वतंत्र चरित्र सांगणारा एकहि प्राचीन ग्रंथ नाही. रामायण महाभारतासह वेगवेगळ्या महापुराणांतून

परशुराम मंदिर इतिहास
परशुराम येथील भगवान परशुरामांचे मंदिर इ. स. ५७० मध्ये बांधण्यात आले, चालुक्य घराण्याचा सम्राट पुलकेशी याने सार्वभौमत्व घोषित केल्यानंतर इ. स. ५७० मध्ये चिपळूण येथे अश्वमेध

परशुराम स्थान
प्रभू रामचंद्राने उत्तर –दक्षिण भारत जोडला, तर भगवान श्रीकृष्णाने पूर्व- पश्चिम भारत एकमेकांना जोडला, असे म्हटले जाते, पण त्यापूर्वी काही हजार वर्षे भगवान परशुरामांनी

परशुरामक्षेत्र
श्रीक्षेत्र परशुराम ही भगवान परशुरामांची त्यांनी निवडलेली तपोभूमी मानण्यात येते.भगवान परशुरामांनी आपले वडील महर्षी जमदग्नी यांची हत्या करणाऱ्या