प्रसादालय सुविधा

भगवान श्री परशुराम यांच्या दर्शनासाठी अनेक भाविक वेगवेगळ्या गावांमधुन येतात. मंदिराजवळ न्याहारीची, जेवणाची वगैरे सोय नसल्यामुळे भाविकांना मोठी अडचण होत असे. विश्वस्त समितीच्या हे लक्षात आले व प्रसादालय ही वास्तू उभी राहीली. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना डाळ तांदुळाची खिचडी व प्रसादाचा शिरा असे रोज प्रसाद म्हणून दिले जाते.
प्रसादाची वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत असते. श्रावण महिन्यात दर सोमवारी खास उपवासाचा प्रसाद दिला जातो. महाशिवरात्र या दिवशी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. या दिवशी जवळजवळ 10 ते 15 हजार भाविकांना खास उपवासाचा प्रसाद दिला जातो.

भक्तनिवास

  1. भक्तनिवास शयनगृह 20 रूपये एका व्यक्तीसाठी देखील उपलब्ध आहे.
  2. प्रत्येक अतिरिक्त व्यक्तीसाठी  रु.50 अतिरिक्त.
  3. आवश्यकतेनुसार शुद्ध शाकाहारी जेवण अल्प दरात उपलब्ध .