श्री क्षेत्र परशुराम मंदिर उत्सव थेट दर्शन सुविधा ई-सेवा ई-प्रकाशन विश्वस्त प्रकल्प अभिप्राय संपर्क
परशुराम मंदिरामध्ये साजरे होणारे धार्मिक सण–
चैत्र – गुढीपाडवा, अखंड हरीनाम सप्ताह, रामनवमी, हनुमानजयंती       वैशाख – अक्षय तृतिया       जेष्ठ – वटपौर्णिमा         आषाढ – आषाढी एकादशी         श्रावण – परमपुज्य श्री ब्रम्हेंद्रस्वामी पुण्यतिथी, पवित्ररोपण, श्रीकृष्ण जयंती         भाद्रपद – गणेशोत्सव        अश्विन – नवरात्रोत्सव, दसरा, कोजागिरी पौर्णिमा, दिपावली       कार्तिक – कार्तिकी एकादशी        मार्गशीर्ष – संतांची एकादशी        पौष – मकरसंक्रांत        माघ – पायीवारी, गणेश जयंती , महाशिवरात्र        फाल्गुन – होळी पौर्णिमा

देवभूमी कोकण

        कोकण भूमी ही परशुरामांनी निर्माण केलेली भूमि आहे. प्रत्यक्षात गुजराथपासून केरळपर्यंत परशुराम निर्मित भूमीआहे.कोकणला ‘देवभूमी’ मानण्यात येते. येथील सुंदर निसर्ग, अथांग सागराचे व सह्याद्रीच्या शिखरांचे सान्निध्य व लोकोत्तर महापुरुषांची जन्मभूमी हे कोकणचे वैशिष्ट्य या देवभूमीत शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेली अनेक देखणी मंदिरे आहेत, सिद्ध पुरुषांची पवित्र स्थाने आहेत. अनेक मंदिरे स्वयंभू स्थान लाभलेली आहेत. साऱ्या देशातून या देवभूमीत पर्यटनासाठी आणि देवदर्शनासाठी भाविक येत असतात. कोकणी माणूस अत्यंत धार्मिक तेवढाच अतिथ्यशील आहे.
       श्रीक्षेत्र परशुराम हे शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेले महेंद्र पर्वतावरील तीर्थक्षेत्र आहे.चिपळूणपासून पाच मैलांवर असलेल्या या तीर्थक्षेत्रास श्रीपरशुरामांच्या वास्तव्यामुळे पौराणिक संदर्भ आहेत व परमहंस ब्रह्मेंद्रस्वामी यांनी तीनशे वर्षांपूर्वी तेथे उभारलेल्या प्रकल्पाला व महाराष्ट्रभर केलेल्या सार्वजनिक व हिंदवी स्वराज्याच्या कार्याला विशेष महत्त्व आहे.
Mobirise

परशुराम चरित्र

विष्णूचा सहावा अवतार मानल्या गेलेल्या भगवान परशुरामांचे स्वतंत्र चरित्र सांगणारा एकहि प्राचीन ग्रंथ नाही. रामायण महाभारतासह वेगवेगळ्या महापुराणांतून
पुढे वाचा...

Mobirise

परशुराम मंदिर इतिहास 

परशुराम येथील भगवान परशुरामांचे मंदिर इ. स. ५७० मध्ये बांधण्यात आले, चालुक्य घराण्याचा सम्राट पुलकेशी याने सार्वभौमत्व घोषित केल्यानंतर इ. स. ५७० मध्ये चिपळूण येथे अश्वमेध पुढे वाचा...

Mobirise

परशुराम स्थान

प्रभू रामचंद्राने उत्तर –दक्षिण भारत जोडला, तर भगवान श्रीकृष्णाने पूर्व- पश्चिम भारत एकमेकांना जोडला, असे म्हटले जाते, पण त्यापूर्वी काही हजार वर्षे भगवान परशुरामांनी पुढे वाचा...

Mobirise

परशुरामक्षेत्र

श्रीक्षेत्र परशुराम ही भगवान परशुरामांची त्यांनी निवडलेली तपोभूमी मानण्यात येते.भगवान परशुरामांनी आपले वडील महर्षी जमदग्नी यांची हत्या करणाऱ्या  
पुढे वाचा...

© मुद्रणाधिकार २०१७ श्री क्षेत्र परशुराम - सर्व हक्क आरक्षित.
Created By IrisDame